नौपाडा व चितळसर पोलिसांची एकाच रात्री धडक कारवाई;

नौपाडा व चितळसर पोलिसांची एकाच रात्री धडक कारवाई;

Published on

ठाण्यातील बेकायदेशीर डान्सबारवर पोलिसांचा छापा
२९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : ठाणे शहरातील बेकायदेशीर आणि अश्लील नृत्य प्रकारांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली आहे. नौपाडा आणि चितळसर पोलिसांनी रविवारी (ता. २५) रात्री केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तब्बल २९ महिला डान्सर, बार मॅनेजर, वेटर आणि ग्राहकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे बेकायदेशीर डान्सबार चालकांचे धाबे दणाणले आहेत.
नौपाडा पोलिसांनी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास नौपाडा येथील शिल्पा बार ॲण्ड रेस्टॉरंट येथे छापा टाकला. या वेळी १४ महिला गाण्याच्या तालावर ग्राहकांशी अश्लील नृत्य करत असल्याचे आढळले. तर, या बार चालकाकडे डान्सबारसंबंधी कोणताही वैध परवाने नसल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी १४ महिला डान्सर, मॅनेजर, तीन पुरुष वेटर व चार ग्राहक यांच्याविरुद्ध वविध कलमान्वये नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चितळसर पोलिसांनी रविवारी रात्री पावणेएकच्या सुमारास कापुरबावडी नाक्यावरील स्वागत बार येथे छापा टाकला. येथे १५ महिला वेटर या बारमधील गाण्यांवर ग्राहकांसमोर अश्लील नृत्य करत असल्याचे आढळले. याप्रकरणी बार मालक सुशील प्रभुदास पारवे, मॅनेजर अरुण शेट्टी, वेटर अमोल राठोड, सुरेश प्रधान चितळसर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com