बोईसरमध्ये आजारांवर रामबाण उपाय

बोईसरमध्ये आजारांवर रामबाण उपाय

Published on

बोईसरमध्ये आजारांवर रामबाण उपाय
कमी खर्चातील उपचारांमुळे टीमा हॉस्पिटलमध्ये गर्दी
बोईसर, ता. २८ (वार्ताहर) : बदलते हवामान, सर्दी-खोकला, ताप, पोटाचे विकार व इतर संसर्गजन्य आजारांमुळे बोईसर परिसरात रुग्णसंख्या वाढली आहे. अशा काळात कमी खर्चात उपचार मिळत असल्याने बोईसर येथील टीमा हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
बोईसरमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे टीमा हॉस्पिटलवर मोठा ताण आला आहे. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी, जुन्या इमारतीत सुरू असल्याने दुरुस्ती व मूलभूत सुविधा देण्यात अडचणी येत आहेत. शवविच्छेदनासाठी स्वतंत्र खोली नसणे, सुरक्षिततेचा अभाव तसेच वाढती गर्दीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संजय नगर येथे प्रस्तावित शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तातडीने उभारून नागरिकांच्या सेवेत सुरू करावी, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे. तसेच तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कामगारही उपचारासाठी येथे येत आहेत.
़़़़़़़ः------------------------
...तोपर्यंत गैरसोय
बोईसरचे प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या टिमा असोसिएशनच्या जुन्या, खासगी इमारतीत सुरू आहे. त्यामुळे दुरुस्ती, सुधारणा करणे शक्य होत नाही. संजय नगर येथे प्रस्तावित शासकीय इमारत उभारणीस किमान दोन ते तीन वर्षे लागणार असल्याने नागरिकांची गैरसोय कायम राहणार आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com