वैभवशाली मराठी भाषेचे दगाबाज कोण? विषयावर लेख स्पर्धा
‘वैभवशाली मराठी भाषेचे दगाबाज कोण?’ विषयावर लेख स्पर्धा
मुलुंड, ता. २८ (बातमीदार) ः मराठी भाषेला क्षीण करणारे दगाबाज कोण? बाजारू शिक्षणव्यवस्था, पालकांची महत्त्वाकांक्षा की बदलत्या जगाचा व्यवहार? या विषयावर मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईच्या वतीने मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत कामगार नेते वसंतराव होशिंग स्मृती लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शब्दमर्यादा १,००० असून स्पर्धकांनी १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत chalval १९४९@gmail.com यावर लेख पाठवावेत. देशपरदेशातील मराठी भाषाप्रेमी, साहित्यिक, राजकारणी, कलावंत, खेळाडू, स्पर्धा परीक्षार्थी, शिक्षक-प्राध्यापक-विद्यार्थी यांनी यात भाग घ्यावा. या स्पर्धेची शब्दमर्यादा एक हजार असून, पहिल्या तीन विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रोख रक्कम तसेच इतरांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल, असे संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी घोषित केले आहे. लेख मराठी युनिकोडमध्ये टायपिंग करून ओपन किंवा pdf स्वरूपात पाठवणे अनिवार्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

