तरंगत्या विमानतळाची पायाभरणी
तरंगत्या विमानतळाची पायाभरणी
वाढवणसाठी ४५ हजार कोटींच्या निधीची तरतूद
पालघर, ता. २८ ः पालघरमध्ये कोणत्याही प्रकारच्या हवामानात कार्यक्षम असलेले वाढवण विमानतळ उभारण्याचे प्रस्तावित आहे. कृत्रिम बेटावर उभे राहणारे विमानतळ केंद्र, राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने अर्थसंकल्पात ४५ हजारांच्या निधीची तरतूद केली जाणार आहे. वाढवण समुद्री विमानतळाच्या एकूण खर्चापैकी २५ हजार कोटी खर्च समुद्रात भरव टाकण्यासाठी वापरण्यात येणार आहे, तर उर्वरित निधी टर्मिनल इमारती, दोन समांतर धावपट्ट्या, एअरसाइड व लँडसाइड अशा पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी खर्ची होणार आहे. या विमानतळावरून नऊ कोटी प्रवासी आणि ३० लाख मेट्रिक टन हवाई मालवाहतूक हाताळण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर आणि पश्चिम समर्पित मालवाहू प्रकल्प असा थेट संपर्क राहणार आहे. त्यामुळे बंदर उभारणीबाबतचा अहवाल सध्या अंतिम टप्प्यात आहे.
----------------------
दळणवळणाला गती
- विमानतळाच्या दळणवळणासाठी बडोदा-मुंबई एक्स्प्रेस-वेशी थेट रस्ता जोड, पश्चिम रेल्वे नेटवर्कशी मेट्रो लिंक तसेच मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वेशी जोडण्यात येणार आहे. प्रस्तावित उत्तन-विरार सागरी सेतूद्वारे मुंबई महानगर प्रदेशाला दिल्ली-मुंबई महामार्गाशी जोडण्याची योजना आहे.
- वाढवण येथे बंदर आणि विमानतळ अशा दुहेरी पायाभूत सुविधा उभारण्यामागे भारतातील औद्योगिक केंद्रे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये समुद्र, हवाई, रेल्वे आणि रस्ते मार्गे बहुआयामी दळणवळण व्यवस्था उभारण्याचा सरकारचा व्यापक दृष्टिकोन आहे.
- भारत-मध्य-पूर्व युरोप आर्थिक आणि व्यापार कॉरिडॉरवर असलेल्या वाढवण बंदरामुळे भारताची कंटेनर हाताळणी क्षमता २३.२ दशलक्ष टीईयूने वाढणार आहे, असा दावा सरकारमार्फत करण्यात आला आहे.
-----------------------------------------
६० ते १०० दिवसांचा कालावधी
प्रस्तावित वाढवण विमानतळासाठी केला जाणाऱ्या पूर्व अभ्यास अहवालामध्ये प्रकल्पाचे बांधकाम व ऑपरेशन याचा सागरी व किनारपट्टीवर होणारा परिणाम याचे मूल्यमापन करणे. विमानतळासाठी प्रस्तावित केलेल्या क्षेत्राचे जलविज्ञान, भूगर्भशास्त्र संबंधातील अभ्यास, उपयोगिता, जागेची निवड किंवा पर्यायी जागा अशा संदर्भातली शिफारशींचा अभ्यास याचा समावेश आहे. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण, महाराष्ट्र सागरी मंडळ व तत्सम यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत प्रस्तावित विमानतळाच्या हद्दीसाठी मर्यादा निश्चित आहे. यासाठी ६० ते १०० दिवसाचा कालावधी दिला आहे.
-----------------------
विमानतळाची वैशिष्ट्ये
प्रस्तावित विमानतळामध्ये स्थलाकृती किंवा भू-तांत्रिक मूल्यांकन अर्थात हवामान मूल्यमापन, समुद्रविज्ञान आणि बाथिमेट्री तपासणी अशा धोक्यांचा अभ्यास, पुनर्वसन, माती प्रक्रिया / सुधारणा, हायड्रोलॉजिकल मूल्यांकन, पर्यावरणीय मूल्यांकन, सीआरझेडनुसार आवश्यक मंजुरी, ऑपरेशनल आणि तांत्रिक मूल्यांकन, धावपट्टीच्या दृष्टिकोनाचा अभ्यास -तपास याची माहिती संकलन करण्याचे काम सुरू आहे.
------------------------------
माहिती संकलन
- अंतरिम अहवाल
- जमिनीची गरज (किनाऱ्यावर/अपतटीय /पुनर्वसन)
- खर्चाचा अंदाज
- विविध नियमांची ओळख, प्रकल्प मंजुरी
- आवश्यक संसाधने
- इतर वैमानिक सर्वेक्षण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

