सावंतवाडी टर्मिनसला गती मिळणार
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २८ : कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या टर्मिनल इमारतीचा विकास गेल्या १० वर्षांपासून रखडला आहे. या टर्मिनलच्या भूमिपूजनाचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, परंतु त्यानंतरही निधीअभावी बांधकाम सुरू न झाल्यामुळे रेल्वे प्रवासी संघटनांनी यावर प्रशासनाला जाब विचारला. नवी मुंबईतील कोकण रेल भवन येथे महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ व इतर कोकण रेल्वे संघटनेचे पदाधिकाऱ्यांची मंगळवारी (ता. २७) बैठक पार पडली. या वेळी लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन कोकण रेल्वे प्रशासनाने दिले.
सावंतवाडी टर्मिनलच्या इमारतीचे काम सुरू करण्यासाठी ४०० कोटी निधी अपेक्षित आहे. कोकण रेल्वेकडे निधी नसल्यामुळे काम रखडले आहे. सावंतवाडीला सरकता जिना लवकरच चालू करण्यात यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. तसेच कोच इंडिकेशन सिस्टीम सुरू करण्यात यावी. राजापूर, कुडाळ, कणकवली येथे सरकता जिना आणि उद्वाहकाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे. विलवडे येथील फलाटाची उंची वाढवावी, तसेच कणकवली स्थानकावर फलाट शेड व फलाट वाढवण्याचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी वांद्रे-मडगाव गाडीला अधिक थांबे मिळवण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली.
रत्नागिरी ते सावंतवाडी पॅसेंजर पुन्हा चालू करण्याच्या विषयावर सकारात्मकता दर्शवली आहे. या प्रसंगी कोकण रेल्वेचे अधिकारी आशुतोष श्रीवास्तव, एल. प्रकाश, राजेंद्र कुमार शर्मा, जुबेर पठाण, राजेंद्र दिनकर घोलप, महासंघाचे अध्यक्ष अभिजीत धुरत, सल्लागार सुरेंद्र नेमळेकर यांच्या उपस्थितीत सभा पार पडली.
राखीव डबा सुरू होणार
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल-मंगळूर एक्स्प्रेसला लवकरच सावंतवाडी थांबा मंजूर करावा, दादर ते सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस २२ डब्यांसह सुरू करावी, या मागण्या करण्यात आल्या. कोरोनामध्ये बंद झालेला पनवेल राखीव जनरल डबा गाडीचे २२ डबे झाल्यावर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

