माणगावात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक रणसंग्राम तापला
माणगावमध्ये निवडणुकीचा धुरळा
जिल्हा परिषदेसाठी १७, तर पंचायत समितीसाठी २६ उमेदवार रिंगणात
माणगाव, ता. २८ (वार्ताहर) ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत मंगळवारी (ता. २७) संपली. या पार्श्वभूमीवर माणगाव तालुक्यातील निवडणूक रिंगणाचे चित्र स्पष्ट झाले असून, जिल्हा परिषदेसाठी एकूण १७ तर पंचायत समितीसाठी २६ उमेदवार अंतिम रिंगणात उतरले आहेत. प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांमुळे सर्वच गटांमध्ये दुरंगी, तिरंगी तर कुठे बहुरंगी लढती पाहायला मिळणार आहे.
माणगाव जिल्हा परिषदेसाठी एकूण १७, तर पंचायत समितीसाठी २६ उमेदवार अंतिम रिंगणात उतरले आहेत. शिंदे गट, ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप यांच्यातील प्रमुख लढतींसोबतच अपक्ष उमेदवारांनीही आव्हान उभे केल्याने सर्वच गटांत चुरस वाढली आहे. पंचायत समितीच्या आठ गणांमध्ये रंगतदार सामने पाहायला मिळणार आहेत. निजामपूरमध्ये तिरंगी लढत होणार असून, शिंदे गटाकडून अक्षय जाधव, राष्ट्रवादी गणेश पवार आणि ठाकरे गटाकडून प्रशांत हिलम हे रिंगणात आहेत, तर साई येथे राष्ट्रवादीच्या संगिता बक्कम आणि ठाकरे गटाच्या निष्ठा वाढवळ यांच्यात दोन अपक्ष उमेदवारांमुळे पेच वाढला आहे. वडवली येथे मनसेचे महेश सावडेकर रिंगणात असल्याने लढत चौरंगी झाली आहे, तर लोणेरेमध्ये सर्वाधिक पाच उमेदवार रिंगणात असून, येथे काँग्रेस, शिंदे गट, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट आमनेसामने आहेत.
अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता प्रचाराला वेग आला आहे. स्थानिक प्रश्न, विकासाची दिशा आणि पक्षीय ताकद यावर आधारित प्रचार रणनीती आखली जात असून, माणगाव तालुक्यातील ही निवडणूक सर्वार्थाने अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

