मासवण गावात संविधान दिंडी

मासवण गावात संविधान दिंडी

Published on

मासवण गावात संविधान दिंडी
मनोर (बातमीदार)ः प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रसेवा दलाच्या वतीने मासवण गावातील हायस्कूलच्या आवारात संविधान दिंडी काढण्यात आली. फुलांनी सजवलेल्या दिंडी रथात संविधानाची प्रास्ताविका ठेवण्यात आली होती. मासवण हायस्कूलचे मुख्याध्यापक भानुदास म्हसकर, मनोर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रणवीर बयेस यांच्या उपस्थितीत संविधान प्रास्ताविकेचे पूजन केल्यानंतर दिंडी मार्गस्थ झाली. यावेळी आदिवासी शिक्षण परिवाराच्या मुलींनी पथनाट्य सादर करून संविधानामुळे मिळालेल्या अधिकारांबाबत जनजागृती केली. लेझीम पथक, ढोल ताशाच्या गजरात निघालेली दिंडी मासवण हायस्कूल ते मासवण नाक्यावर पोहोचल्या नंतर लेझीम नृत्य, मानवी मनोरे रचून संविधानाला मानवंदना देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com