श्री मलंगगड यात्रेसाठी पोलिस प्रशासन सज्ज

श्री मलंगगड यात्रेसाठी पोलिस प्रशासन सज्ज

Published on

श्री मलंगगड यात्रेसाठी पोलिस प्रशासन सज्ज
अप्पर आयुक्तांकडून सुरक्षेचा सखोल आढावा

डोंबिवली, ता. २८ : ठाणे जिल्ह्यातील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या श्री मलंगगड यात्रेला माघ पौर्णिमेनिमित्त सुरुवात होत आहे. या यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, यासाठी अप्पर पोलिस आयुक्त संजय जाधव यांनी सर्व यंत्रणांचा सखोल आढावा घेतला. यात्रेच्या पूर्वसंध्येला आयोजित बैठकीत पोलिस, महसूल, महावितरण, आरोग्य आणि वाहतूक विभागासह विविध हिंदू संघटनांचे प्रतिनिधी व वंशपरंपरागत ट्रस्टी उपस्थित होते.

संपूर्ण यात्रा परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असेल. ठाणे पोलिस आयुक्तालयातील सर्वात मोठा फौजफाटा हिललाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीत तैनात करण्यात आला आहे. नेवाळी ते श्री मलंगगड मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष पार्किंग झोन तयार करण्यात आले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळामार्फत जादा बस सोडण्यात येणार आहेत. वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणला सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य विभाग, अग्निशमन दल आणि पाणीपुरवठा यंत्रणा २४ तास कार्यरत राहणार आहेत. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी गडाच्या पायथ्याशी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

भक्तीचा सोहळा
जया एकादशीच्या पहाटे वंशपरंपरागत पुजारी ॲड. विजय केतकर यांच्या निवासस्थानावरून पालखीचे प्रस्थान होईल. माघ पौर्णिमेच्या मुख्य दिवशी गडावर पालखी सोहळा पार पडणार असून, देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

भाविकांसाठी महत्त्वाची माहिती
नेवाळी नाका ते मलंगगड मार्ग केवळ यात्रा वाहनांसाठी प्राधान्याने खुला असेल. गडाच्या पायथ्याशी असलेल्या निश्चित जागेवरच वाहने उभी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही मदतीसाठी स्थानिक पोलिस मदत केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com