चिमुकल्यांनी सांगितले संविधानाचे महत्त्व
चिमुकल्यांनी सांगितले संविधानाचे महत्त्व
साई कृपा कॉलनीत ‘प्रजासत्ताक दिन’ उत्साहात
टिटवाळा, ता. २८ (वार्ताहर) : उल्हासनगर-५ येथील महिला विकास केंद्र या संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात ७६वा प्रजासत्ताक दिन अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्याच्या माध्यमातून परिसरातील लहानग्यांमध्ये राष्ट्रभक्तीची चेतना आणि संविधानिक मूल्यांचा जागर करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिराताई कांबळे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश कांबळे आणि विनय कांबळे उपस्थित होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने सोहळ्याची मंगलमय सुरुवात झाली. राष्ट्रगीताच्या जयघोषाने संपूर्ण परिसरात देशप्रेमाची ऊर्जा संचारली होती.
प्रमुख पाहुणे सुरेश कांबळे यांनी प्रजासत्ताक दिनावर आधारित विशेष गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांनी मुलांना संविधानाची भूमिका आणि जबाबदार नागरिक बनण्याचे महत्त्व सोप्या भाषेत पटवून दिले. तसेच हिराताई कांबळे यांनी आपल्या मार्गदर्शनात देशासाठी चांगले नागरिक घडणे हीच खरी देशसेवा आहे, असे प्रेरणादायी विचार मांडले.
चिमुकल्यांचा उत्साह
कार्यक्रमाचे आकर्षण ठरली ती म्हणजे लहान मुलांनी केलेली देशभक्तीपर भाषणे. अत्यंत आत्मविश्वासाने मुलांनी संविधानावरील आदर आणि भविष्यातील भारताचे स्वप्न आपल्या शब्दांतून व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन स्वप्नील वहाणे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी मुलांना अल्पोपहार देण्यात आला. महिला विकास केंद्र या संस्थेच्या या उपक्रमामुळे लहानग्यांच्या मनात देशाबद्दलचा अभिमान, कर्तव्यभावना आणि जबाबदारीची जाणीव रुजवण्याचे मोलाचे कार्य घडले असून, परिसरात या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

