“आज माझा मोठा भाऊ हरपला” -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक

“आज माझा मोठा भाऊ हरपला” -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक

Published on

आज माझा मोठा भाऊ हरपल्यासारखी भावना आहे. अजित पवार हे केवळ नेते नव्हते, तर ते एक अभ्यासू, वेळेच भान ठेवणारे आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले व्यक्तिमत्त्व होते. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले. अजित पवार पहाटेपासून कामाला लागायचे. सकाळी ६ वाजताही त्यांनी आदेश दिल्याचे मी स्वतः पाहिले आहे. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करूनच ते बोलायचे. रोखठोक स्वभाव असला, तरी मनाने ते अत्यंत निर्मळ होते. मंत्रिमंडळात जेव्हा राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चर्चा व्हायची, तेव्हा अजित पवार नेहमीच वास्तव मांडायचे आणि योग्य दिशा सुचवायचे. त्यांचा अनुभव, अभ्यास आणि प्रशासनावरील पकड आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरायची. काल-परवाच एका कार्यक्रमात त्यांची भेट झाली. आज त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबाचेच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक निर्भीड, धडाडीचा आणि अनुभवी नेता गमावला असून, त्यांच्या कार्याची आठवण कायम जनतेच्या मनात राहील.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com