तिचा आवाज आता कधीच ऐकू येणार नाही!

तिचा आवाज आता 
कधीच ऐकू येणार नाही!
Published on

तिचा आवाज आता
कधीच ऐकू येणार नाही!

पिंकी माली यांच्या वडिलांना दु:ख अनावर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : ‘पप्पा, मी उद्या अजितदादा पवार यांच्यासोबत बारामतीला जाणार आहे. त्यांना ड्रॉप करून नांदेडला जाईन आणि हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला फोन करीन, असे पिंकीने मला सांगितले. आमच्यातील हा संवाद शेवटचा ठरला. आता कधीच तिचा आवाज ऐकायला मिळणार नाही,’ हे सांगताना पिंकी यांचे वडील शिवकुमार माली यांचा कंठ दाटून आला हाेता. बारामती विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये फ्‍लाइट अटेंडंट पिंकी यांचाही समावेश होता.

‘सकाळ’ने पिंकी यांचे वडील शिवकुमार यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या प्रत्येक शब्दागणिक एका वडिलांचे दुःख, असहाय्यता स्पष्ट जाणवत होती. ‘मुलीच्या निधनाची बातमी ऐकून आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मी बारामतीला निघालो आहे,’ हे सांगताना त्यांचा आवाज गहिवरून येत होता.

पिंकी माली यांनी अजित पवारच नव्हे, तर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, नारायण राणे यांच्यासह अनेक व्हीआयपी व्यक्तींच्या प्रवासात अटेंडंट म्हणून काम केले हाेते, असे पिंकी यांच्या वडिलांनी सांगितले. पिंकी यांचा स्वभाव सांगताना त्यांचे शेजारी वीरेंद्र देसाई म्हणाले, ‘ती खूप शांत, साधी आणि आपल्या कामावर मनापासून प्रेम करणारी मुलगी होती. ती कधी कुणावर रागावली किंवा बोलताना तिचा आवाज वाढला, असे कधीच झाले नाही.’

मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील असलेले माली कुटुंब अनेक दशकांपासून महाराष्ट्रात वास्तव्यास आहे. प्रभादेवीत बीडीडी चाळीत लहानाची मोठी झालेल्या पिंकी यांनी बारावीनंतर एअर होस्टेस क्षेत्राची निवड केली. आवश्यक प्रशिक्षण पूर्ण करून त्या पाच ते सहा वर्षांपासून खासगी चार्टर्ड जेटमध्ये विमान अटेंडंट म्हणून कार्यरत होत्या.

पिंकी यांना एक विवाहित मोठी बहीण आणि एक लहान भाऊ आहे. आज पिंकीच्या जाण्याने कुटुंबातील आनंद, स्वप्ने आणि आशा क्षणार्धात उद्ध्वस्त झाल्या आहेत. आज तिच्या जाण्याने एक घर, एक कुटुंब आणि अनेक मने पोरकी झाली आहेत,’ असे तिचे शेजारी सांगतात.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com