गांधीविचारांचा पुनर्विचार
ठाण्यात ‘गांधीहत्या आणि आपण’ विषयावर व्याख्यान
ठाणे, ता. २८ (बातमीदार) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७८व्या पुण्यतिथीनिमित्त ठाणे शहरात ‘गांधीहत्या आणि आपण’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी ५ वाजता मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात होणार आहे. धर्मराज्य पक्ष, ठाणे जिल्हा काँग्रेस आणि मूलभूत अधिकार संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या व्याख्यानासाठी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विवेक कोरडे आणि डाव्या चळवळीतील प्रखर विचारवंत कॉ. आनंद तेलतुंबडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. गांधीजींच्या विचारांची आजच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीतील उपयुक्तता तसेच गांधीहत्येमागील वास्तव आणि त्याभोवती पसरवण्यात आलेल्या गैरसमजांचा ऊहापोह या व्याख्यानात करण्यात येणार आहे.
धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी सांगितले, की महात्मा गांधी आणि त्यांच्या हत्येबाबत पद्धतशीरपणे पसरवण्यात आलेल्या अफवांचा सप्रमाण समाचार या व्यासपीठावर घेतला जाईल. कार्यक्रमासाठी ठाणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले असून, या वेळी मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला असून, गांधीविचार समजून घेण्यासाठी आणि राष्ट्रपित्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

