जुनिपर ग्रीन एनर्जीकडून राज्यात ७२ मेगावॉटचा सौर प्रकल्प कार्यन्वित

जुनिपर ग्रीन एनर्जीकडून राज्यात ७२ मेगावॉटचा सौर प्रकल्प कार्यन्वित

Published on

‘ज्युनिपर ग्रीन’चा राज्यात
७२ मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : ज्युनिपर ग्रीन एनर्जीने सोलापूर जिल्ह्यात ७२ मेगावाॅटचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या प्रकल्पातून तयार होणारी वीज महावितरणला पुरवली जाणार आहे. त्यामुळे महावितरणला हरित ऊर्जा वापराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वीज उपलब्ध होणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारकडून सौर-पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यावर भर दिला जात आहे. त्याचाच भाग म्हणून ज्युनिपर ग्रीन एनर्जीकडून सोलापूर येथे १३३ मेगावाॅट क्षमतेचा सौर आणि पवन ऊर्जा निर्मितीचा एकत्रित (हायब्रिड) वीज प्रकल्प उभारला जात आहे. त्यापैकी ७२ मेगावाॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने त्यामधून वीजनिर्मिती सुरू केली आहे. त्यामुळे राज्याच्या सौरऊर्जा निर्मितीमध्ये भर पडली आहे. ज्युनिपर ग्रीन एनर्जी आणि महावितरणमध्ये वीजखरेदी करार झाला असून, पुढील ३० वर्षांसाठी तयार होणारी वीज महावितरणला उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com