बीएमडी तपासणी शिबिर

बीएमडी तपासणी शिबिर

Published on

बीएमडी तपासणी शिबिर
कासा, (बातमीदार) : डहाणू एज्युकेशन ट्रस्ट संचलित के. एल. पोंदा हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी विशेष बोन मिनरल डेन्सिटी (बीएमडी) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी (ता. २८) श्री बटुकभाई पोंदा सभागृहात सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर पार पडले. उपाध्यक्ष अजय बाफना व विश्वस्त . डॉ. रोहित भंसाली यांच्या संकल्पनेतून, संस्थेच्या सर्व विश्वस्त व कार्यकारिणी सदस्यांच्या प्रेरणेतून आणि मुख्याध्यापक सोपान इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील आजी-माजी शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी डहाणूतील सुप्रसिद्ध डॉ. संजय सोहनी, डॉ. एस. जी. भंसाली, डॉ. लक्ष्मण सोनावणे, डॉ. आदित्य अहिरे यांची उपस्थिती लाभली. शिबिरात एकूण १०१ शिक्षक व कर्मचाऱ्यांची कॅल्शियम पातळी व हाडांची घनता तपासणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com