

राजकीय प्रतिक्रिया
------
अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने उत्तम नेता गमावला असून, कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. एनएसयूआय अध्यक्षपदाच्या कारकिर्दीपासूनच माझे अजित पवारांशी जवळचे नाते होते. नंतर जेव्हा मी अखिल भारतीय युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो, तेव्हा मी त्यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबाशी तेच नाते कायम ठेवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झाल्यानंतरही हे प्रेमाचे नाते कायम राहिले. महाराष्ट्र काँग्रेसचा प्रभारी म्हणून काम करताना मला त्यांच्याशी अधिक जवळून संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांच्या निधनाने मराठा राजकारणातील एक महान व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या कुटुंबाला हा मोठा धक्का सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी मी प्रार्थना करतो.
- रमेश चेन्निथला, ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी
=========
अजितदादांची बातमी ही धक्कादायक आहे! शब्दच नाहीत. दादांसोबत गेली पाच-सहा वर्षे काम करण्याची संधी मिळाली. पहिल्या सरकारमध्ये आणि नंतर काही दिवस विरोधी पक्षात. त्यांची विधिमंडळ कारभारावर असलेली रुबाबदार पकड आणि प्रेमळ स्वभाव हा आमच्यासारख्या अनेकांना आवडायचा. मी हे विरोधी पक्षात असतानादेखील अनेकदा जाहीरपणे म्हटलं होतं. आजची बातमी खरंच धक्का देणारी आहे.
-आदित्य ठाकरे, आमदार, शिवसेना (ठाकरे)
=========
अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाच्या दुःखद वृत्ताने मन अत्यंत व्यथित झाले आहे. अजितदादा हे केवळ माझे नेते नव्हते, तर ते माझ्या कुटुंबाचे आधारवड होते. माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि संघर्षाच्या काळात, दादा माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या पाठीशी ढाल बनून खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी दिलेली ती साथ मी कधीही विसरू शकणार नाही. त्यांच्या निधनाने केवळ माझेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. एक कर्तव्यदक्ष आणि शब्दाला पक्का असणारा लोकनेता आपण गमावला आहे. दादा, तुमच्या आठवणी आणि तुमचे मार्गदर्शन सदैव माझ्या स्मरणात राहील.
- नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष, एनसीपी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.