काँक्रीटीकरणाची कामे कुलाब्यात वेगात
काँक्रीटीकरणाची कामे कुलाब्यात वेगात
मुंबई, ता. २९ ः मुंबई महापालिकेची निवडणूक संपल्या संपल्या रस्त्यांच्या कामाला वेग आला आहे. कुलाबा येथील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे वेगात सुरू असून, निवडणुकीमुळे मागे पडलेली कामे आता पुन्हा धडाक्यात सुरू झाल्याचे दिसून येत आहेत.
रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांचा गेल्या काही महिन्यात खोळंबा झाला होता. पावसाळ्यापूर्वी थांबविलेली रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडली होती. आता पालिका निवडणुकीचा निकाल लागला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने ऱखडलेली कामे पुन्हा सुरू केली आहेत. या कामांना वेग दिल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
कुलाबा येथील रहिवाशांनी चांगल्या स्थितीत असलेल्या रस्त्यांचे खोदकाम करण्याऐवजी खराब स्थितीत असलेल्या रस्त्यांना सिमेंट काँक्रीट (सीसी) रस्त्यांसाठी प्राधान्य द्यावे अशी मागणी केली होती. हीच मागणी भाजपचे कुलाब्यातील नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पत्राद्वारे केली होते. या मागणीची दखल घेऊन पालिका प्रशासनाने निवडणूक संपताच रस्ताकामे वेगाने सुरू केली आहेत.
टप्प्याटप्प्याने रस्ताकामे सुरू
कुलाबा भागातील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण टप्प्याटप्प्याने सुरू असल्याचे दिसून येत आहे. वाहतुकीवर परिणाम होणार नाही, याची काळजी घेऊन कामे करावीत, अशा सूचना पालिका प्रशासनाने कंत्राटदारांना दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

