महापौर-उपमहापौर निवडीची रणधुमाळी

महापौर-उपमहापौर निवडीची रणधुमाळी

Published on

उल्हासनगर, ता. २८ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिकेच्या सत्ताकारणाचा कौल लावणारी महापौर व उपमहापौर निवड प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. शहराच्या नेतृत्वाचा फैसला ठरवणाऱ्या या निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. ३०) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे दाखल केली जाणार आहे. त्यानंतर मंगळवारी (ता. ३) दुपारी १ वाजता महापौर व उपमहापौर पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या मुख्यालयातील सर्वसाधारण सभागृहात होणाऱ्या या विशेष महासभेतून पुढील अडीच वर्षांसाठी शहराच्या कारभाराची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, हे स्पष्ट होणार आहे. नामनिर्देशनाच्या दिवशीच इच्छुक उमेदवारांची खरी संख्या, पक्षांची रणनीती आणि संभाव्य समीकरणे उघडकीस येणार आहे. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत मतदानाद्वारे अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
विशेष बाब म्हणजे, यंदा महापौर पदाचे प्रथम अडीच वर्षांसाठी आरक्षण ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)’ असे निश्चित केल्याने या प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असून, उमेदवार निवड, संख्याबळाची जुळवाजुळव आणि पाठिंबा मिळवण्यासाठी हालचाली वेगाने सुरू आहेत. ३० जानेवारीला होणाऱ्या नामनिर्देशन प्रक्रियेनंतर चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. ३ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता होणाऱ्या मतदानातून उल्हासनगरच्या नव्या महापौर व उपमहापौरांची नावे निश्चित होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com