जांभिळघर येथे नेतृत्वगुण विकास शिबिर
बदलापूर, ता. २८ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संचालक; तसेच मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक यांच्या संयुक्त विद्यमाने बदलापूरजवळील जांभिळघर येथे तीनदिवसीय नेतृत्वगुण व व्यक्तिमत्त्व विकास निवासी शिबिर घेण्यात आले. १८ ते २१ जानेवारी दरम्यान पार पडलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला.
शिबिराचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, नेतृत्व क्षमता विकसित करणे, संघभावना निर्माण करणे तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव जागृत करणे हा होता. त्यासाठी योग-प्राणायाम, व्यक्तिमत्त्व विकास सत्रे, नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण, सामाजिक जाणीव वृद्धिंगत करणारे उपक्रम होते. आमदार किसन कथोरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, मुंबई विभागीय समन्वयक डॉ. विनोद गवारे, विजय कूकरेजा आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. शिबिरात स्वच्छता, आरोग्य, सामाजिक प्रश्नांवरील व्याख्यानमाला, बौद्धिक खेळ, समूहचर्चा तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम हे विशेष आकर्षण ठरले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मप्रत्यय, शिस्त आणि सहकार्याची भावना अधिक दृढ झाली. या निवासी शिबिरात मुंबई विभागातील ५४ महाविद्यालयांमधील १०१ विद्यार्थी, ४५ कार्यक्रम अधिकारी तसेच जिल्हा समन्वयक सहभागी झाले होते. शिस्तबद्ध नियोजन, प्रेरणादायी वातावरण आणि ज्ञानवर्धक उपक्रमांमुळे हे नेतृत्वगुण विकास शिबिर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व संस्मरणीय ठरले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

