अट्टल घरफोडी करणारी चौकडी जेरबंद

अट्टल घरफोडी करणारी चौकडी जेरबंद

Published on

अट्टल घरफोडी करणारी चौकडी जेरबंद
ठाणे शहर, ग्रामीण, मुंबई व कोल्हापूर येथे गुन्हे
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : नौपाडा परिसरात मेडिकलसह इतर पाच दुकाने फोडणाऱ्या चौकडीला ठाणे मालमत्ता गुन्हे कक्षेच्या पथकाने अटक केली आहे. विनयकुमार पासवान, प्रदीप निशाद, राजविर लाहोरी आणि सलमान अली शेख, अशी चार जणांची नावे आहेत. त्या चौकडीकडून सव्वा लाखांचे सहा मोबाईल फोन जप्त केले आहे. तसेच त्यांनी साथीदारसह ठाणे शहर, ग्रामीण, मुंबई शहर व कोल्हापूर या ठिकाणच्या घरफोडीसह एकूण १८ गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नौपाडा परिसरातील अर्थव मेडिकल दुकानासह इतर पाच दुकानांचे एकाच रात्री शटर उचकटून मोबाईल आणि रोख रक्कम चोरी केली होती. याप्रकरणी मेडिकलचे मालक अनिल परबळकर यांच्या तक्रारीवरून नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, नौपाडा पोलिसांसह मालमत्ता गुन्हे कक्ष यांच्यामार्फत समांतर तपास सुरू झाला. बातमीदाराकडून आणि सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चार जणांना अटक करण्यात आली. पासवान आणि निषाद या दोघांना उल्हासनगर तर लाहोरी याला गुजरात, बिलीमोरा आणि शेख याला पुणे देहूरोड येथून अटक केली. ते रिक्षा आणि दुचाकी चोरी करून त्याचा वापर गुन्हे करण्यासाठी करत होते. किराणा दुकान व मेडिकल शॉपचे शटर उचकटून घरफोडी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. सर्व आरोपी सध्या टिळकनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस कोठडीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com