दागिने चोरीतील सूत्रधार गजाआड

दागिने चोरीतील सूत्रधार गजाआड

Published on

दागिने चोरीतील सूत्रधार गजाआड
विक्रमगड पोलिसांकडून १८ लाखांचा मुद्देमाल जप्त
विक्रमगड, ता. २९ (बातमीदार)ः विक्रमगड येथील सराफा दुकानातील १४८.९ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात आरोपीसह चोरीचे १४ लाखांचे दागिने जप्त केले आहेत.
विक्रमगड येथील महालक्ष्मी ज्वेलर्सचे मालक आदिनाथ महादेव कचरे यांच्या दुकानात १४ जानेवारी रोजी दुपारी ३ ते ४ च्या सुमारास ३५ ते ४० वयोगटातील एक अनोळखी व्यक्ती दुकानात आला होता. दुकानातील काउंटरवरील कामगार काही काळासाठी बाजूला गेल्याची संधी साधत आरोपीने १८ लाख रुपये किमतीचे, ३५ जोड सोन्याचे टॉप्स असलेली पिशवी चोरली होती. प्रकरणात या विक्रमगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे मोहम्मद कलाम सलामद्दीन अन्सारी (वय ४२, रा. उमर रेसिडेन्सी, मेहबूब मंजिल, कार्गिल रोड, नायर पेट्रोलपंपाजवळ, भिवंडी, जि. ठाणे) याला भिवंडी येथून ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
-----------------------
१३ गुन्हे दाखल
ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, पालघर, मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्तालय तसेच रायगड जिल्हा परिसरात सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याच्याविरुद्ध १३ मालमत्तेविषयक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com