

केमिकलयुक्त पाणी भूखंडावर
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील धक्कादायक प्रकार
बोईसर, ता. २९ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ई-झोन परिसरात प्रदूषणाचा गंभीर, धोकादायक प्रकार समोर आला आहे. येथील गटारातून वाहणारे केमिकलयुक्त पाणी थेट मोकळ्या भूखंडावर सोडले जात असल्याने कारवाईची मागणी होते.
औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांतून निघणारे रसायनयुक्त सांडपाणी हे नियमाप्रमाणे चेंबरद्वारे सीईटीपीकडे पाठवणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमावलीचे सर्रास उल्लंघन होत आहे. केमिकलयुक्त पाणी गटारामार्गे वाहत मोकळ्या भूखंडांमध्ये, काही ठिकाणी रस्त्यावरही पसरत असल्याचे दिसून येत आहे. नेमक्या कोणत्या कारखान्यातून हे पाणी सोडले जात आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही, पण पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, येथून ये-जा करणारे नागरिक, कामगार व वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच जमीन, भूजलाचे प्रदूषण होण्याचा धोका वाढला असून, पर्यावरणाला गंभीर इजा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, संबंधित कारखाना बंद असताना अशा प्रकारे पाणी साचलेले असल्याने ही बाब चिंताजनक मानली जात आहे.
------------------------------
पाणी नक्की कुठून येते, त्याची चौकशी करून संबंधितावर योग्य कारवाई करण्यात येईल.
- अविनाश संखे, उपअभियंता, तारापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.