

**माध्यम प्रायोजक ‘सकाळ’*
ठाण्यातील खारेगावात रंगणार कुणबी स्नेहसंमेलन
मान्यवरांच्या उपस्थितीत गुणगौरव सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचल
कळवा, ता. २९ (बातमीदार) ः ठाणे व पालघर जिल्ह्यात शेतकरी कुणबी समाजासाठी समाजसेवा व विधायक उपक्रम राबविणाऱ्या ठाणे शहर कुणबी समाज सेवा संघाचा २१ वा स्नेहसंमेलन सोहळा रविवारी (ता. १) पार पडणार आहे. ठाण्यातील खारेगाव येथील गणेश विद्यालयाच्या मोकळ्या मैदानात सायंकाळी ४ वाजता हा सोहळा रंगणार आहे.
स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी खास पाहुणे म्हणून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, आमदार किसन कथोरे, शिवसेना नेते व जिजाऊ संघटनेचे संस्थापक नीलेश सांबरे, महापालिका गटनेते मुकेश मोकाशी, ठाणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत पठारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी जवळपास चार ते पाच हजार कुणबी कुटुंब सहभागी होणार आहेत.
या स्नेहसंमेलनात दहावी आणि बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, समाजातील सेवानिवृत्त कर्मचारी, विविध नैपुण्यधारकांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच समाजातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार केला जाणार आहे. या स्नेहसंलनात विविध वस्तूंचे स्टॉल मांडण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात विशेष म्हणजे आदिवासी तारपा नृत्य, कुणबी भगिनींचे नृत्य व लेझीम प्रात्याक्षिकांचे सादरीकरण व कुणबी संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन सेवासंघाचे अध्यक्ष पी. एन. पाटील, सचिव किशोर पाटील व सांस्कृतिक कमिटीचे प्रमुख किसन बोंद्रे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.