मलंगगड यात्रेनिमित्त परिसरात जड वाहतुकीला बंदी

मलंगगड यात्रेनिमित्त परिसरात जड वाहतुकीला बंदी

Published on

मलंगगड यात्रेनिमित्त परिसरात जड वाहतुकीला बंदी
उल्हासनगर, ता. २९ (बातमीदार) : श्री मलंगगड यात्रा उत्सवास गुरुवारी (ता. २९) उत्साहात सुरुवात झाली असून, २ फेब्रुवारी रोजी निघणाऱ्या मुख्य पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. भाविकांची गर्दी आणि सुरक्षितता लक्षात घेता ७ फेब्रुवारीपर्यंत मलंगगड परिसरातील जड वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना २९ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत लागू राहील.

पोलिस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या बंदीतून वगळण्यात आले आहे. अधिसूचनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व ठिकाणी वाहतूक पोलीस, वॉर्डन आणि पोलिस मित्रांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती विठ्ठलवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली.

वाहतुकीतील महत्त्वाचे बदल
१. शिळफाटा ते नेवाळी नाका मार्ग
बदल: शिळफाट्याकडून नेवाळी नाका व मलंग वाडीकडे येणाऱ्या सर्व जड वाहनांना काटई नाका येथे ‘प्रवेश बंद.’
पर्याय : ही वाहने नेतीवली, टाटा पॉवर आणि मानपाडा पोलिस ठाणे मार्गे इच्छितस्थळी जातील.

२. नवी मुंबई-तळोजा ते नेवाळी नाका मार्ग :
बदल : तळोजाकडून येणाऱ्या जड वाहनांना खोणी नाका (निसर्ग हॉटेल) येथे ‘प्रवेश बंद.’
पर्याय : ही वाहने खोणी नाक्यावरून डावीकडे काटई नाक्याच्या दिशेने वळण घेऊन पुढे जातील.

३. बदलापूर ते नेवाळी-ठाणे मार्ग :
बदल : बदलापूरकडून नेवाळी, मलंगवाडी, नवी मुंबई व ठाणे शहराकडे जाणाऱ्या जड वाहनांना शिवाजी नगर टी-पॉइंट येथे ‘प्रवेश बंद.’
पर्याय : ही वाहने अंबरनाथ टी-पॉइंट येथून उजवीकडे वळून फॉरेस्ट नाका व साई बाबा मंदिर मार्गे जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com