शामनगर येथे आरोग्य शिबिर व हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

शामनगर येथे आरोग्य शिबिर व हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

Published on

शामनगर येथे आरोग्य शिबिर व हळदी-कुंकू समारंभ उत्साहात
जोगेश्वरी, ता. २९ (बातमीदार) : सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, शामनगर आणि सबर्बन डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत सवलतीच्या दरात भव्य मेडिकल हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचा गरजू नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. एकूण ९४ नागरिकांनी सहभाग नोंदवत विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या. यानंतर मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला तब्बल ६३२ महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये ३२ एकल महिला तसेच २८ विधवा महिलांनीही सहभाग नोंदवला. मंडळातर्फे सर्व महिलांचा सन्मानपूर्वक मान राखण्यात आला. या उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, शामनगर यांच्याकडून सातत्याने केले जात असल्याचे नागरिकांतून कौतुक व्यक्त करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com