‘छाया कला सर्कल’चा वर्धापन दिन उत्साहात
‘छाया कला सर्कल’चा वर्धापनदिन उत्साहात
तुर्भे, ता. २ (बातमीदार) : ठाणे-बेलापूर पट्ट्यातील संगीत क्षेत्रात नावलौकिक असलेल्या छाया कला सर्कल ब्रास बँड पथकाचा ५६वा वर्धापनदिन सोमवारी (ता. २६) उत्साहात साजरा करण्यात आला. १९६९ ला दिवाळे कोळीवाड्यात स्थापन झालेल्या या बँडने गेली पाच दशके आगरी-कोळी संस्कृतीची ओळख जपत सुरेल संगीतसेवा अखंड सुरू ठेवली आहे.
बदलत्या काळात तंत्रज्ञान आले, माध्यमे बदलली; मात्र पारंपरिक वाद्यसंगीताची प्रतिष्ठा जपण्यात छाया कला सर्कलने सातत्य राखले. विवाह समारंभ, धार्मिक उत्सव, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांतून या बँडने राज्यासह देशातील विविध भागांत आपली कला सादर केली आहे.
वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात नवदुर्गा महिला प्रासादिक भजन मंडळ, प्रेमसागर ब्रास बँड, श्री महाकालेश्वर ब्रास बँड आणि श्री गणेश हनुमान ब्रास बँड यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेल संगम पुढेही कायम ठेवणार असल्याचे अध्यक्ष चंद्रकांत कोळी यांनी सांगितले.
फोटो ओळ : छाया कला सर्कल ब्रास बँडच्या ५६व्या वर्धापनदिनानिमित्त कलाकार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

