मालमत्ता कर वसुलीसाठी कृती आराखडा
मालमत्ता करवसुलीला वेग
कृती आराखडा तयार करण्याच्या आयुक्तांच्या सूचना
भाईंदर, ता. २९ (बातमीदार) : महापालिका निवडणुकीमुळे दीड महिना करवसुलीवर परिणाम झाला होता. याच पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त करवसुली करण्यासाठी क्षेत्रनिहाय कृती आराखडे तयार करण्याच्या सूचना आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
महापालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर हा प्रमुख स्रोत आहे. मार्च अखेर ३३४ कोटींचा कर वसूल करण्याचे उद्दिष्ट नक्की करण्यात आले आहे, परंतु डिसेंबर, जानेवारीत कर विभागाचे सर्व कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतल्याने कराची २०७ कोटी २८ लाख ४७ हजार ९०६ रुपये इतकीच वसुली झाली आहे. याच अनुषंगाने मंगळवारी (ता. २७) आयुक्तांनी करवसुलीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीत मालमत्ता करवसुलीची प्रभागनिहाय सद्यःस्थिती, निश्चित उद्दिष्टांच्या तुलनेत झालेली प्रगती, गेल्या वर्षांच्या तुलनेतील वाढ याचा आढावा घेण्यात आला आहे.
----------------------------
जनजागृती मोहीम राबवा
- करवसुलीची कार्यपद्धती अधिक सक्षम, पारदर्शक व परिणामकारक करण्यासाठी क्षेत्रनिहाय कृती आराखडे तयार करणे, कर भरण्याच्या ऑनलाइन सुविधांचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबवणे.
- डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करणे तसेच कर भरण्याची प्रक्रिया सुलभ व जलद करण्याबाबत आयुक्तांनी सूचना दिल्या. थकबाकीदारांना नियमानुसार नोटिसा बजावणे, मालमत्ता जप्त करणे आदी करवाईसह आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
------------------------------
मालमत्ताधारक संख्या
१,४२,७८१ ऑनलाइन - ११० कोटी ७१ लाख ४८ हजार ९४८
१,३२,७३४ ऑफलाइन - ९६ कोटी ५६ लाख ९८ हजार ८५९
एकूण मालमत्ता कर - २०७ कोटी २८ लाख हजार ८०६
---------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

