महापौर पदापासून भाजप दूरच

महापौर पदापासून भाजप दूरच

Published on

महापौरपदापासून भाजप दूरच
समित्यांच्या वाटपावरून सत्ताधारी युतीत पेच
सकाळ वृत्तसेवा
ठाणे ता. २९ : ठाणे महापालिका निवडणुकीत संख्याबळ वाढवूनही भाजपला महापौरपदापासून दूर राहावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ७५ जागांसह एकहाती सत्ता मिळविणाऱ्या शिंदे गटाने महापौरपद देण्यास स्पष्ट नकार दिल्याने, आता भाजपने स्थायी, परिवहन आणि विषय समित्यांमध्ये मोठ्या वाट्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. निवडणुकीत २८ जागा जिंकणाऱ्या भाजपने सुरुवातीला दोन वर्षांसाठी महापौरपदाची मागणी केली होती; मात्र शिंदे गटाने हा प्रस्ताव पूर्णपणे फेटाळून लावला आहे. त्याऐवजी उपमहापौरपद आणि समित्यांची पदे आलटून-पालटून देण्याचा पर्याय भाजपासमोर ठेवला आहे.

महापौरपद हुकल्यानंतर भाजपने आता सत्तेत सन्मानजनक वाटा मिळवण्यासाठी खालील समित्यांवर दावा ठोकला आहे. स्थायी व परिवहन समितीवर किमान एक वर्षासाठी या महत्त्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, तसेच शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदावरही भाजपने दावा केला आहे. विषय व प्रभाग समित्यामध्ये पाच वर्षांच्या कार्यकाळात आलटून-पालटून अध्यक्षपदे मिळावीत, अशी भूमिका घेतल्याचे काही स्थानिक नेत्यांनी घेतल्याचे समजते.

‘वेट अँड वॉच’ची भूमिका
महापौरपद न मिळाल्यास उपमहापौरपदही स्वीकारायचे नाही, अशी भूमिका भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. समित्यांमध्येही योग्य वाटा न मिळाल्यास विरोधी बाकावर बसण्याची शक्यता काही ज्येष्ठ नगरसेवकांनी वर्तवली आहे. यामुळे ३० जानेवारीला होणाऱ्या अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर भाजपने उपमहापौर पदासाठी अर्ज भरला नाही, तर शिंदे सेना आपल्याच नगरसेवकाची वर्णी त्या जागेवर लावण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत युतीमधील तणाव अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com