पश्चिम रेल्वेवर गैरसोयींचा प्रवास
पश्चिम रेल्वेवर गैरसोयींचा प्रवास
केळवे रोड स्थानकातील सुविधांपासून प्रवासी वंचित
पालघर, ता. २९ ः पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थानक असलेल्या केळवे रोड येथे सुविधांचा अभाव आहे. प्रवाशांच्या आंदोलनानंतर स्वयंचलित जिन्याची, उद्वाहिकेची व्यवस्था करण्यात आली. मात्र, सेवा सुरू झाली नसल्याने गैरसोयीचा प्रवास सुरू आहे.
वैतरणा ते डहाणूपर्यंत रेल्वेसेवा ही उपनगरी रेल्वेसेवा म्हणून ओळखली जाते. प्रत्येक स्थानकाच्या पूर्व बाजूस लांबच लांब, झिगझॅग पूल चढ-उतार करताना ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला, रुग्णांबरोबर प्रवाशांसाठी त्रासदायक झाले आहे. यामुळेच सफाळे येथे जनआंदोलन झाल्यानंतर तेथे तातडीने उद्वाहन तसेच सरकता जिना तातडीने उपलब्ध करण्यात आला होता. मात्र, स्थानकांच्या बाबतीत दुजाभाव कायम आहे. काही महिन्यांपासून केळवे रोड स्थानकातील एमआरव्हीसी चौपदरीकरण अंतर्गातील कार्य संथ गतीने सुरू आहेत. त्यामुळे कामे अत्यंत संथ गतीने होताना दिसत आहे.
----------------------------
प्रवासी त्रस्त
- विरार-डहाणू चौपदरीकरणाचे काम एमयुटीपी टप्पा तीन अंतर्गत सुरू आहे. स्थानक विकास, प्रवासी सुविधाशी संबंधित कामे प्रगतिपथावर आहेत, पण प्रवासीवर्गाला आवश्यक प्राथमिक सुविधा अजूनही दिलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
- पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण यांच्या आपापसातील जबाबदारी टाळण्यामुळे उद्वाहन आणि सरकता जिना अशा सुविधा प्रलंबित आहेत. सुविधेविषयी पत्रव्यवहार केल्यास दोन्ही प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत आहे. यामुळे दैनंदिन प्रवास त्रासदायक झाला आहे.
--------------------------------------
पश्चिम रेल्वे, मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण यांनी जबाबदारी स्पष्ट करावी. प्रत्येक स्थानकासाठी उद्वाहन. सरकता जिना बसवण्याचे लेखी वेळापत्रक जाहीर करावे. तसेच चौपदरीकरणाच्या प्रकल्पाचे काम मुदतीत पूर्ण करावे.
- हितेश सावे, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

