नोवेल साळवे यांच्यावरील हल्लेखोरावर गुन्हा दाखल
नोवेल साळवे यांच्यावरील हल्लेखोरांवर गुन्हा दाखल
दीड महिन्याच्या उपोषणानंतर पोलिसांना जाग
कल्याण, ता. २९ (वार्ताहर) : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव आणि सामाजिक कार्यकर्ते नोवेल साळवे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अखेर एक वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साळवे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर दीड महिना केलेल्या प्रदीर्घ उपोषणानंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
९ जून २०२५ रोजी उल्हासनगर येथे एका वृद्ध व्यक्तीला काही जण मारहाण करत होते. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी साळवे मध्यस्थी करायला गेले असता, अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामुळे साळवे यांना रक्तदाबाचा त्रास होऊन हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. यानंतर त्यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली आणि ते २४ दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते. साळवे यांच्या कुटुंबीयांनी घटनेच्या वेळी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात माहिती दिली होती; मात्र पोलिसांनी साळवे यांचा जबाब न नोंदवता हे प्रकरण ‘दफ्तरी फाइल’ (बंद) करून टाकले होते. या अन्यायाविरोधात साळवे यांनी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांकडे अनेकदा दाद मागितली. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.
आझाद मैदानावरील लढा
अखेर न्यायासाठी साळवे यांनी ८ डिसेंबर २०२५ पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले. थंडी-वाऱ्याची तमा न बाळगता दीड महिना हे आंदोलन सुरू राहिल्याने प्रशासनावर दबाव वाढला. अखेर मंगळवारी पोलिसांनी दोषींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने साळवे यांच्या लढ्याला यश आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

