३० जानेवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान जनजागृती
कुष्ठरोग निर्मूलनासाठी ‘स्पर्श’ अभियान
मुंबई, ता. २९ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या ३० जानेवारीच्या कुष्ठरोग निवारण दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. ‘भेदभाव समाप्त करू या, सन्मानाची वागणूक देऊ या’ हे या अभियानाचे घोषवाक्य आहे. कुष्ठरोगाबाबतचे गैरसमज दूर करून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनातून जागरूकता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये यासाठी विशेष सभा आयोजित करून कुष्ठरोगाबाबत समाजाला सकारात्मक संदेश देण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा संदेश सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्यामार्फत वाचला जाणार आहे. यात भाषणे, प्रतिज्ञा, प्रश्नोत्तर सत्रे तसेच रोगमुक्त कुष्ठरुग्णांचा सन्मान अशा विविध उपक्रमांचा समावेश असेल. गावातील एखादी व्यक्ती महात्मा गांधी (बापू) यांचा पेहराव करून किंवा ‘सपना’ या शाळकरी मुलीमार्फत कुष्ठरोगाविषयी माहिती व संदेश दिला जाणार आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत ‘स्पर्श’ ही राष्ट्रव्यापी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
कुष्ठरोग निवारण पंधरवड्याच्या कालावधीत शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शाळांमध्ये प्रार्थनेनंतर कुष्ठरोग प्रतिज्ञा, सूचनाफलकांवर जनजागृती संदेश, नुक्कड नाटके, प्रश्नमंजूषा, निबंध व चित्रकला स्पर्धा, पथनाट्य, प्रभातफेरी तसेच कुष्ठरोग दौड (मॅरेथॉन) आयोजित करण्यात येणार आहेत.
...
विभागाचे आवाहन
नागरी भागात स्वयंसेवी संस्था, अशासकीय व आंतरराष्ट्रीय समाजसेवी संस्था, रोटरी क्लब, लायन्स क्लब आदींच्या सहकार्याने कुष्ठरोग निवारणदिनी विशेष जनजागृती कार्यक्रम राबविले जाणार आहेत. स्थानिक केबल, वर्तमानपत्रे, महिला मंडळे, बचत गट, तरुण मंडळे, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या कार्यशाळा, बाजारपेठांतील प्रदर्शन व आरोग्य मेळावे यांच्या माध्यमातून समाजात शास्त्रीय माहिती पोहोचविण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

