दलोंडे शाळेला शैक्षणिक मदत
भिवंडी, ता. २९ (वार्ताहर) : विद्युत प्रसारण पायाभूत सुविधा क्षेत्रात कार्यरत रेसोनिया लिमिटेड कंपनीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत भिवंडी तालुक्यातील दलोंडे येथील जिल्हा परिषद शाळेला संगणक व विविध शैक्षणिक साहित्याची भेट दिली.
खावडा ४-सी या प्रकल्पाअंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यात विद्युत वहन व टॉवर उभारणीचे काम रेसोनिया लिमिटेड कंपनीकडून सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक समुदाय विकास व शिक्षणाप्रती असलेली आपली बांधिलकी कंपनीने पुन्हा अधोरेखित केली आहे. कार्यक्रमप्रसंगी रेसोनिया लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी रजनीश पांडे, राजकिशोर, उत्तम शिंदे, अजित यादव, विजय उईके यांच्यासह स्थानिक विद्यार्थी, शिक्षक व भागीदार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत झेंडावंदन करण्यात आले. या वेळी शाळेच्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी संगणक, फळे, कपाटे, पंखे, खुर्च्या तसेच इतर आवश्यक साहित्य कंपनीतर्फे उपलब्ध करून देण्यात आले.
श्रवणदोष विद्यार्थ्यांकडून कला सादर
याच उपक्रमांतर्गत रेसोनिया लिमिटेडने पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील नीलेश एल. मुर्डेश्वर श्रवणदोष असलेल्या विद्यार्थ्यांची शाळा येथे आयोजित ‘आविष्कार २०२६’ या वार्षिक सांस्कृतिक संमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचे प्रायोजन केले. ही शाळा प्रगती प्रतिष्ठान या संस्थेद्वारे संचालित आहे. या कार्यक्रमामुळे श्रवणदोष असलेल्या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक सादरीकरणांच्या माध्यमातून आपली कला सादर करण्यासाठी उत्साही व्यासपीठ मिळाले. विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी पारितोषिक वितरण समारंभही पार पडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

