ठाणे जिल्ह्यात ‘मच्छर ला टक्कर’

ठाणे जिल्ह्यात ‘मच्छर ला टक्कर’

Published on

ठाणे जिल्ह्यात ‘मच्छरला टक्कर’
कीटकजन्य आजारांविरोधात भव्य जनजागृती चित्ररथ मोहीम
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : ठाणे जिल्ह्यात सध्याच्या काळात हे कीटकजन्य आजार नागरी आरोग्यासाठी गंभीर आव्हान ठरत आहेत. त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अत्यंत आवश्यक आहेत. यासाठी ठाणे जिल्हा आरोग्य विभाग सरसावला असून, ‘मच्छरला टक्कर’ अभियान हाती घेण्यात आले आहे.
सध्याच्या काळात हे कीटकजन्य आजार नागरी आरोग्यासाठी गंभीर आव्हान ठरत असून, त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अत्यंत आवश्यक आहेत. याची दाखल घेत ठाणे जिल्ह्यात भारताच्या ७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर ठाणे जिल्हा आरोग्य विभागामार्फत ‘मच्छरला टक्कर’ या कीटकजन्य आजार प्रतिबंधात्मक विशेष अभियानाची सुरुवात करण्यात आली. यासाठी एक चित्ररथ तयार करण्यात आला असून, या चित्ररथ मोहिमेच्या माध्यमातून डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी, घरगुती व परिसरातील स्वच्छता, साचलेल्या पाण्याचे व्यवस्थापन, वैयक्तिक प्रतिबंधात्मक उपाय याबाबतची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे कीटकजन्य आजारांवर मात करण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास जिल्हा आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानामुळे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागृती वाढून कीटकजन्य आजारांचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

हिवतापाचे दोन हजार ७३ रुग्ण
डेंग्यूचे एक हजार ९३ रुग्ण
चिकुनगुनियाचे १६८ रुग्ण
(मागील वर्षाची आकडेवारी)

चार चित्ररथांद्वारे जनजागृती
चार जनजागृतीपर चित्ररथांचे उद्‍घाटन करण्यात आले. हे चित्ररथ संपूर्ण ठाणे शहरात फिरविण्यात येणार असून, नागरिकांमध्ये हिवताप (मलेरिया), डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांबाबत जागृती निर्माण करण्याचे कार्य करणार आहेत. सध्याच्या काळात हे कीटकजन्य आजार नागरी आरोग्यासाठी गंभीर आव्हान ठरत असून, त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अत्यंत आवश्यक आहेत.

हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम
फेब्रुवारी महिन्यात १० ते २३ फेब्रुवारीदरम्यान भिवंडी तालुक्यात हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोषी शिंदे यांनी दिली. या मोहिमेंतर्गत तालुक्यातील सर्व नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्या देण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. या चित्ररथ फेरीच्या प्रसंगी जिल्हा हिवताप कार्यालयातील कर्मचारी आणि ठाणे महापालिकेच्या हत्तीरोग विभागातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com