बेस्ट कर्मचाऱ्यांची संख्या घटू लागली
बेस्ट कर्मचाऱ्यांची संख्या घटू लागली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ ः बेस्ट उपक्रमातून पुढील दोन वर्षांत २५ हजार कर्मचाऱ्यांपैकी निम्म्याहून अधिक कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची वाढती संख्या बेस्टमध्ये सध्या चिंतेचा विषय ठरली आहे. बेस्ट प्रशासन या समस्येबाबत लवकरच तोडगा काढण्याच्या विचारात असल्याचे बेस्टच्या सूत्रांनी सांगितले.
बेस्ट उपक्रमाची कोंडी वाढतच जाणार असून, बेस्ट चालवायची कशी, असा पेच बेस्टपुढे निर्माण होणार आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमात आता कर्मचाऱ्यांचीही कमतरता भासू लागली आहे. बेस्ट उपक्रमात सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, सध्या २५ हजार ५६२ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. पुढील दोन वर्षांत निम्म्याहून अधिक कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या कमी होणार आहे. त्यामुळे बेस्टच्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम होणार आहे.
...
देणीही थकीत
सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची देणी द्यावी लागणार आहेत. अनेकांची देणी थकीत आहेत. त्यामुळे कमालीचा रोष निर्माण झाला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. परिणामी बेस्ट प्रशासनाची मोठी अडचण झाल्याचे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

