विमान दुर्घटनेचा तपास पारदर्शी, कालबद्ध पद्धतीने
विमान दुर्घटनेचा तपास
पारदर्शी, कालबद्ध पद्धतीने
नागरी उड्डाणमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांच्या पत्राला उत्तर
मुंबई, ता. २९ : बारामती दुर्घटनाग्रस्त झालेल्या खासगी विमानातील ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. या विमान दुर्घटनेचा नियमांनुसार तपास सुरू करण्यात आला आहे. तो पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने होईल, असे उत्तर नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू किंजरापू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राला दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांना पत्र लिहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या अतिशय वरिष्ठ नेत्यासह अन्य चार जणांना विमान दुर्घटनेत प्राण गमवावे लागले. ही दुर्घटना नेमकी कशामुळे झाली, याच्या कारणांची चौकशी करण्यात यावी, अशी पत्रातून मागणी केली होती. भविष्यात असे अपघात घडणार नाहीत, यादृष्टीने तातडीने पावले उचलण्यात यावीत, अशीही पत्रातून मागणी केली हाेती. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांनी आपल्या उत्तरात तपास पारदर्शक करून त्यासाठीचा अहवाल राज्य सरकारलाही देण्याचे आश्वासन दिले. विमान दुर्घटनेचा तपास ब्युरो (एएआयबी) यांनी सुरू केला असून, यात सर्व टेक्निकल रेकॉर्ड, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्ये यांचा तपास केला जात आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत, यासाठी उपाययोजना करण्यात येतील. या चौकशीत महाराष्ट्र सरकारचेही सहकार्य आम्हाला मौल्यवान असेल, असे नायडू यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

