विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याने नवरा व सासर्‍या विरोधात गुन्हा दाखल , पतीस अटक.

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याने नवरा व सासर्‍या विरोधात गुन्हा दाखल , पतीस अटक.

Published on

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीस अटक
मोखाडा, ता. ३० (बातमीदार) ः मोखाड्यातील सावरपाडा येथील लता गणपत झुगरे (वय ३१) या विवाहितेला नवरा व सासऱ्याने वारंवार शिवीगाळ व मानसिक त्रास दिल्याने तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत विवाहितेचे नाव लता असून तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून तिचा नवरा व सासऱ्याविरोधात मोखाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून नवऱ्याला अटक करण्यात आली आहे.
मोखाडा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, सावरपाडा येथील लता गणपत झुगरे (३१) या विवाहितेस तिचा नवरा गणपत नवसू झुगरे व सासरा नवसू येसू झुगरे हे चार महिन्यांपासून कामावरून वारंवार शिवीगाळ व मानसिक त्रास देत होते. या जाचाला कंटाळून अखेर लताने ३१ डिसेंबरला घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची तक्रार लताचे वडील, भाऊ दादु वारे यांनी मोखाडा पोलिस ठाण्यात केली होती. या घटनेचा तपास केल्यानंतर महिन्यानंतर २९ जानेवारीला मोखाडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रतीक पोकळे यांनी विवाहितेचा नवरा आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिचा पती गणपत झुगरे यास अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com