रूमच्या भाड्यावरून दोन गटात तुफान राडा ; ३३ जणांवर गुन्हा दाखल

रूमच्या भाड्यावरून दोन गटात तुफान राडा ; ३३ जणांवर गुन्हा दाखल

Published on

हाणामारीप्रकरणी ३३ जणांवर गुन्हा
भिवंडी, ता. ३० (वार्ताहर) ः रूमचे भाडे न दिल्याच्या कारणावरून भाडोत्री आणि रूममालक यांच्या दोन गटांत शिवीगाळ, लाथा-बुक्क्यांसह, लाकडी दांडक्याने तुफान हाणामारी झाल्याची घटना नवी वस्तीतून समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गटातील एकूण ३३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नसरीन आजम चौधरी, नगमा हिजहार चौधरी, नगमा हिजहार चौधरी यांची आई, रशिदाबानी अजमल चौधरी, अमिना सलाम खान, मन्ना (पूर्ण नाव माहीत नाही), शाविरा अश्रफअली चौधरी, अजमल चौधरी, अकबर चौधरी, अश्रफअली चौधरी तसेच इतर १० ते १२ बुरखा घातलेल्या महिला व दोन अनोळखी व्यक्ती आणि बदुदिन, रियाज, सिराज, समशाद, बहुदिन यांची भावजई तसेच इतर दोन ते तीन अनोळखी महिला, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत, तर या धुमश्चक्रीत दोन्ही गटांतील व्यक्ती जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमा खातून आणि रुबिया चौधरी या दोन गटांत रूमचे भाडे देण्यावरून गुरुवारी सायंकाळी वाद झाला. त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन शिवीगाळ लाथा-बुक्क्यांसह, लाकडी दांडक्याने हमरातुमरीत दोन्ही गटांतील काही जण जखमी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com