सावरकर सदन वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यास योग्य!
सावरकर सदन वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यास योग्य!
भारतीय पुरातत्त्व विभागाची उच्च न्यायालयात माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : स्वातंत्र्यवीर विनायक सावरकरांचे दादरस्थित निवासस्थान ‘सावरकर सदन’ ही वास्तू वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यास योग्य असल्याची शिफारस शुक्रवारी (ता. ३०) भारतीय पुरातत्त्व विभागाने (एएसआय) प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात केली आहे.
सावरकर सदन ही इमारत राज्य संरक्षित स्मारक किंवा पालिका वारसा स्थळांच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी योग्य असल्याचे ‘एएसआय’ने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. अभिनव भारत काँग्रेसचे पंकज फडणीस यांनी याप्रकरणी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेसमोर सुनावणी सुरू आहे. खंडपीठाच्या आदेशानुसार ‘एएसआय’कडून प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. ‘एएसआय’च्या १९५८च्या प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्व स्थळे आणि अवशेष कायद्यांतर्गत एखादी वास्तू राष्ट्रीय स्मारक किंवा स्थळ संरक्षित घोषित केल्यानंतरच त्याचे जतन होऊ शकते. त्यासाठी संबंधित वास्तू १०० वर्षांपेक्षा पुरातन असणे आवश्यक आहे. सावरकर सदन गजबजलेल्या शहरी भागात असून अद्याप केंद्राने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले नसल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे; परंतु या इमारतीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्याला वारसा संरक्षण मिळणे आवश्यक असून, राज्य शासन किंवा महापालिकेने त्याचे संरक्षण केले पाहिजे, असेही प्रतिज्ञापत्रात एएसआयने अधोरेखित केले आहे.
...
ऐतिहासिक घटनांची साक्षीदार
सावरकर सदन १९३८मध्ये बांधलेली दोन मजली इमारत आहे. या ठिकाणी सावरकर १९६६मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत राहिले. हे एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळ असून, जिथे सुभाषचंद्र बोस यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांसोबत बैठका पार पडल्या आहेत. सावरकरांच्या निधनानंतर १९८४ मध्ये अतिरिक्त मजले बांधले. त्यामुळे या इमारतीचे आठ सदनिका असलेल्या बहुमजली इमारतीत रूपांतर झाले. सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या मालकीची तळमजल्यावर फक्त एक खोली असून, तिथे संग्रहालय आहे. पूर्वी या सदनिकेमधील दोन खोल्या सावरकर कार्यालय म्हणून वापरत असत तिथे सावरकरांशी संबंधित स्मृतिचिन्हे ठेवली आहेत. सावरकरांची सून - सुनंदा विश्वास सावरकर (९२) अजूनही त्याच इमारतीत राहतात, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

