तरूणाला मारहाण करत काढली नग्न धिंड

तरूणाला मारहाण करत काढली नग्न धिंड

Published on

ठाकरे बंधूंबाबत अपशब्द काढले?
तरुणाला मारहाण करत काढली नग्न धिंड
बोळींज, ता. ३० (बातमीदार) ः ठाकरे बंधूंबाबत समाजमाध्यमावार अपशब्द काढणाऱ्या एका मराठी तरुणाला मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप देत नग्न धिंड काढली. नालासोपारा येथे गुरुवारी रात्री हा प्रकार घडला. या मारहाणीची चित्रफीत समाजमाध्यमावर व्हायरल करण्यात आली आहे.
नालासोपारा येथील आचोळे परिसरात राहणारा सूरज राजे शिर्के हा तरुण समाजमाध्यमावर रील्स बनवतो. गेल्या काही दिवसांपासून तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत रील्स बनवत होता. त्यात त्याने ठाकरे बंधूंबाबत अपशब्द वापरले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. मात्र, सूरज राजेशिर्के कुठे राहतो, हे समजत नव्हते. कार्यकर्ते त्याचा शोध घेत होते. दरम्यान, गुरुवारी तो नालासोपारा येथील आचोळे परिसरात राहात असल्याचे समजले. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते रात्री त्याच्या घरी गेले आणि घरातून त्याला मारहाण करत बाहेर काढले. त्याची अर्धनग्न धिंड काढत तुळिंज पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले. आपल्या कृत्याबाबत या तरुणाने माफी मागितली. त्याला मारहाण करताना आणि माफी मागतानाची चित्रफीत समाजमाध्यमावर व्हायरल करण्यात आली आहे.
मागील अनेक दिवसांपासून सूरज राजेशिर्के ठाकरे बंधूंबाबत अपशब्द वापरत होता. आम्ही त्याचा शोध घेत होतो. आज तो सापडला. त्याला आम्ही तुळिंज पोलिस ठाण्यात दिले, असे शिवसेनेचे युवानेते रोहन चव्हाण यांनी सांगितले. ठाकरे बंधूंबाबत अपशब्द वापरणारा हा दुर्दैवाने मराठीच आहे, असे मनसेच्या किरण नकाशे यांनी सांगितले. शिवेसना-मनसेचा पराभव अशाच मराठी माणसांमुळे होतो म्हणून आम्ही त्याचा पाहुणचार केला, असे नकाशे यांनी सांगितले.
मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून मला व माझ्या वडिलांना मारहाण केली आणि माझ्या भावाला मारत घेऊन गेले, असे साधना राजेशिर्के हिने सांगितले. आमच्या घराची तोडफोड केली, असेही तिने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com