

जपानमधील स्पर्धेत पालघरचा डंका
डहाणूतील दोन विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय बहुमान
कासा, ता. ३१ (बातमीदार) : आशिया खंडातील विद्यार्थ्यांसाठी जपान येथे आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत डहाणू तालुक्यातील गोवणे येथील इयत्ता सातवीचा विद्यार्थी सूरज भुयाळ, पाचवीतील विद्यार्थिनी आरोही पावबाके यांना पुरस्कार जाहीर झाल्याने जिल्ह्याचा नावलौकिक वाढला आहे.
भारतातून निवड झालेल्या सर्वोत्कृष्ट चित्रांची निवड इंडियन फेडरेशन ऑफ क्लब अँड असोसिएशन फॉर युनेस्को, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. अंतिम टप्प्यासाठी ही चित्रे जपान येथे पाठवण्यात आली. प्रत्येक देशातून आठ बालकलाकारांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, भारतातील आठ विजेत्यांपैकी महाराष्ट्रातून पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दोघांची निवड करण्यात आली आहे.
------------------------
वारली कलेची मांडणी
स्पर्धेत सूरज भुयाळला ग्रँड प्रिक्स अवॉर्ड जाहीर झाला असून, त्याने चित्रातून भारतीय सण-उत्सव वारली कलेच्या माध्यमातून प्रभावीपणे साकारले होते. व्हिसा, विमानप्रवासाची तिकिटे मिळालेली असताना प्रकृती बिघडल्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकला नाही. तर आरोही पावबाकेला नॅशनल फेडरेशन ऑफ युनेस्को असोसिएशन्स इन जपान संस्थेतर्फे पुरस्कार देण्यात आला. दोन्ही विद्यार्थ्यांना विजय पावबाके यांनी मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.