प्रदूषणकारी सात बांधकामे सीलबंद
वाशी, ता. ३१ (बातमीदार) : नवी मुंबईमध्ये वाढत्या वायू व ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कडक पावले उचलली आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात बांधकाम व विकास प्रकल्पांवर सीलबंदीची कारवाई केली आहे.
बांधकाम स्थळांमुळे होणारे वायू, धूळ व ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने यापूर्वीच मानक कार्यप्रणाली लागू केली आहे. त्यानुसार आवश्यक उपाययोजना न केल्यास दंडात्मक कारवाई व काम बंद करण्याच्या नोटिसा संबंधित विकसक व बांधकामधारकांना बजाविण्यात आल्या होत्या, मात्र, तरीही नियमांचे पालन न केल्याने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सानपाडा परिसरातील विविध बांधकाम व विकास कामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या पुढील काळात नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व विभागांमध्ये वायू प्रदूषण रोखण्यासाठी कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
या प्रकल्पांवर कारवाई
सुरक्षेतील त्रुटी लक्षात घेता २७ जानेवारीला साई अमृत बिल्डर्स, मेट्रीक्स बिल्डर्स, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपर्स, कामधेनु ग्रीन आणि रॉयल पाम डेव्हलपर्स या सानपाडा येथील पाच बांधकाम व विकास प्रकल्प सीलबंद करण्यात आले. तर २९ जानेवारीला कामधेनु लाईफ स्पेस व सत्यम लाईफ स्पेस या आणखी दोन प्रकल्पांवर कारवाई करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

