वेगमर्यादा फलकांमुळे गोंधळ
वेगमर्यादा फलकांमुळे गोंधळ
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील प्रकार
कासा, ता. १ (बातमीदार)ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी अवजड वाहनांसाठी ८० किमी प्रतितास, तर प्रवासी वाहनांसाठी १०० किमी प्रतितास वेगमर्यादा दर्शविणारे फलक लावण्यात आले आहेत, पण फलकांमुळे वाहनचालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
काही ठिकाणी एका फलकावर १०० किमी वेगमर्यादा दाखवण्यात आली होती, तर काही अंतरावरच वाहने हळू चालवा, अशा प्रकारची सूचना देणारे फलक होते. या विसंगतीमुळे महामार्गावरील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महामार्ग प्राधिकरणाने तातडीने दखल घेतली आहे. अनेक ठिकाणी वेगमर्यादा फलक दुरुस्त करण्यात आले असून, अपघातप्रवण स्थळे, तीव्र वळणे आणि पूल या ठिकाणी वेगमर्यादा ६० ठेवण्यात आली आहे. तसेच बंद असलेले विजेचे दिवेही सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.
-----------------------------
अपघातांची शक्यता
महामार्गावर अनेक ठिकाणी काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. प्राधिकरणाच्या वतीने विविध अपघातग्रस्त ठिकाणी सूचनाफलक, वेगमर्यादा फलक व इतर मार्गदर्शक चिन्हे लावली आहेत. मात्र, रस्त्याची स्थिती अजूनही समाधानकारक नाही. काही ठिकाणी खड्डे, उंच सखल पृष्ठभाग तसेच उड्डाणपुलांवरील चढ-उतार धोकादायक ठरत असल्याने अपघातांची शक्यता आहे.
--------------------------------
महामार्गावर पूर्वी चांगला असलेला डांबरी रस्ता काढून काँक्रीटीकरण करण्यात आले. मात्र, हा रस्ता वाहनचालकांना आरामदायी वाटत नाही. अनेक ठिकाणी गाड्यांची आदळआपट होते. टोल देऊनही प्रवास सुखकर वाटत नाही.
- हरेश मुकणे, उपसरपंच, कासा
----------------------------------
महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. ठेकेदारामार्फत काही ठिकाणी चुकीने लावलेले वेगमर्यादा फलक सुधारण्यात आले आहेत. पुलांवरील बंद असलेले विजेचे दिवेही सुरू करण्यात आले आहेत.
- सुहास चिटणीस, महामार्ग प्रबंधक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

