नवनिर्वाचित नगरसेवकांची पालिका अधिकाऱ्यांशी भेट

नवनिर्वाचित नगरसेवकांची पालिका अधिकाऱ्यांशी भेट

Published on

नवनिर्वाचित नगरसेवकांची पालिका अधिकाऱ्यांशी भेट
वाहतूक कोंडी व पर्यायी मार्गांसंदर्भात चर्चा

विरार, ता. ३१ (बातमीदार) : विरार पश्चिमच्या नारिंगी येथील रेल्वे पूल लवकरात लवकर वाहतुकीस खुला करण्यासह सुरू असलेल्या इतर कामांचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत नवनिर्वाचित नगरसेवकांनी भेट घेतली आहे. या बैठकीत नगरसेवक अजीव पाटील, प्रफुल्ल साने तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
रेल्वे पूल रखडल्यामुळे नागरिकांना होत असलेल्या अडचणी, वाहतूक कोंडी आणि इतर पर्यायी मार्गांवरील ताण याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कामाच्या सद्यस्थितीची माहिती देत उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्याबाबत आश्वासन दिले आहे. पुलाशी संबंधित रस्ते, गटारे, पथदिवे आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांवरही लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणारा त्रास लक्षात घेता नारिंगी येथील रेल्वे पूल तातडीने सुरू करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com