मालाड लोकल हत्याकांडाच्या तपासाला गती

मालाड लोकल हत्याकांडाच्या तपासाला गती
Published on

‘एआय’ शोधणार साक्षीदार
मालाड लोकल हत्याकांडाच्या तपासाला गती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मालाड स्थानकात चर्चगेट-बोरिवली धीम्या लोकलच्या सामान्य डब्यात झालेल्या प्रवाशाच्या हत्येप्रकरणी रेल्वे पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेला १६.५ सेंटीमीटर लांबीचा धारदार चिमटा पोलिसांनी जप्त केला असून, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा शोध घेण्यासाठी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चेहरा ओळख तंत्रज्ञान वापरले जात आहे.

मालाड लोकलमधील हत्येच्या घटनेनंतर स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी ओमकार शिंदे याला ताब्यात घेण्यात आले; मात्र लोकलमधील गर्दीमुळे आणि अनेक प्रवासी पुढील स्थानकांवर उतरून गेल्याने साक्षीदार शोधणे पोलिसांसमोर आव्हान ठरत आहे. आरोपीने हल्ल्यानंतर मालाड पूर्वेकडील स्थानक परिसरात पळ काढताना चिमटा फेकून दिला होता. इमिटेशन दागिन्यांसाठी वापरला जाणारा हा चिमटा पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही घटना शनिवारी, २४ जानेवारी रोजी चर्चगेटहून दुपारी ४.४६ वाजता सुटलेल्या बोरिवली धीम्या लोकलमध्ये घडली. किरकोळ वादातून सुरू झालेल्या भांडणाचा शेवट हिंसक हल्ल्यात झाला आणि आलोक कुमार सिंग यांचा मृत्यू झाला. आरोपी आणि हत्यार ताब्यात असून, आता साक्षी नोंदवून लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, संबंधित लोकलमधील प्रवासी किंवा घटनेचे साक्षीदार असलेल्या नागरिकांनी बोरिवली लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com