सीएसएमटी पुनर्विकासासाठी ८५ दिवसांचा ब्लॉक
सीएसएमटी पुनर्विकासासाठी ८५ दिवसांचा ब्लॉक
अनेक एक्स्प्रेस ‘सीएसएमटी’ऐवजी दादर स्थानकापर्यंतच धावणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील पुनर्विकास कामासाठी फलाट क्रमांक १६ व १७वर १ फेब्रुवारी ते २६ एप्रिल या कालावधीत एकूण ८५ दिवसांचा ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात अनेक मेल व एक्स्प्रेस गाड्या सीएसएमटीऐवजी दादर स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार असल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास सुरू असून, या टप्प्यात फलाटांवरील पायाभूत सुविधा बळकट करणे, संरचनात्मक दुरुस्ती, ट्रॅक सुधारणा ओव्हरहेड इक्विपमेंटची कामे तसेच सुरक्षिततेशी संबंधित अत्यावश्यक कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी फलाट क्रमांक १६ आणि १७ बंद ठेवण्यात येणार आहेत. या फलाटावरून अमरावती, अकोला, नागपूर, बल्लारशाह, भुसावळ, जळगाव, नांदेड, लातूर आदी महत्त्वाच्या शहरांकडे जाणाऱ्या अनेक मेल व एक्स्प्रेस गाड्या सुटतात. १ फेब्रुवारीपासून पुढील आदेश येईपर्यंत अप मार्गावरील संबंधित गाड्या सीएसएमटीऐवजी दादर स्थानकात थांबविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अंतिम स्थानक गाठण्यासाठी लोकल रेल्वे किंवा अन्य पर्यायी वाहतूक साधनांचा वापर करावा लागणार आहे. दरम्यान, ट्रेन क्रमांक १२१३४ मंगळुरू-सीएसएमटी एक्स्प्रेस ही गाडी ठाणे स्थानकापर्यंतच धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाड्यांची सुधारित माहिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन केले आहे.
दादर स्थानकापर्यंत धावणाऱ्या गाड्या
ट्रेन क्रमांक गाडीचे नाव
१२११२ अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस
११००२ बल्लारशाह-सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस
१२८१९ हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस
११०२० भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस
२२१४४ बिदर-सीएसएमटी एक्स्प्रेस
२२१०८ लातूर-सीएसएमटी एक्स्प्रेस
२२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

