‘इंडिया मीडिया लिंक’चा सामाजिक उपक्रम
‘इंडिया मीडिया लिंक’चा सामाजिक उपक्रम
टाटा रुग्णालयाबाहेरील गरिबांना मिठाई आणि ब्लँकेटचे वाटप
मुंबई, ता. ३१ : इंडिया मीडिया लिंक ॲन्ड इव्हेंटस मॅनेजमेंटतर्फे नुकताच एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. देशभरातून परेल येथील टाटा रुग्णालयामध्ये कर्करोग उपचारासाठी येणाऱ्या आणि पदपथावर झोपणाऱ्या पीडित आणि गोरगरिबांसाठी मिठाई आणि ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. पहाटेच्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी ब्लँकेट मिळाल्यामुळे या गरिबांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते.
इंडिया मीडिया लिंक ॲन्ड इव्हेंटस मॅनेजमेंटचे संचालक के. रवी यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. के. रवी म्हणाले की, देशभरातून टाटा रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी रुग्ण येत असतात. त्यातील कित्येकांची परिस्थिती हलाखीची असते. त्यांच्या नातेवाइकांना पदपथाचा आसरा घ्यावा लागतो. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरलेला असतो. अशा प्रकारचा उपक्रम गेली सोळा वर्षे सुरू असून, यंदाचे सतरावे वर्ष आहे. पीडितांना मदत करणे आणि त्यांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवणे हाच आमचा यामागचा हेतू आहे. कार्यक्रमात समाजसेविका भाग्यश्री वर्तक, संगीतकार दिलीप सेन, चित्रपट अभिनेते अली खान व त्यांचा मुलगा फरहान अली खान, मंत्रालयातील निवृत्त सहसचिव प्रीतम आठवले आदी सहभागी झाले होते.
फोटो - 165
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

