गुलाबी फुलांनी फुललेला प्रवास

गुलाबी फुलांनी फुललेला प्रवास

Published on

गुलाबी फुलांनी फुललेला प्रवास
पूर्व द्रुतगती मार्गावर ‘वसंत राणी’ची बहार
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : पूर्व द्रुतगती मार्गावरील छेडानगर ते विक्रोळी परिसर गुलाबी रंगांच्या फुलांनी बहरला आहे. ही फुले येथून जाणारे वाहनचालक, प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत.
छेडानगर येथून विक्रोळीकडे जाणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर पर्यावरणाच्या आणि सुशोभीकरणाच्या दृष्टिकोनातून पालिका व बांधकाम विभागातर्फे विविध झाडे लावण्यात आली आहेत. त्यात ‘वसंत रानी’ गुलाबी फुलांची १०० पेक्षा अधिक झाडे लावण्यात आली आहेत. या गुलाबी फुलाच्या झाडाला इंग्रजीत पिंक ट्रम्पेट, पिंक पॉउल, पिंक टीकोमा तर
शास्त्रीय भाषेत या झाडाला ‘टॅब्युबिया पेंटाफायला’ या नावाने ओळखले जाते. दरवर्षीप्रमाणे जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात या झाडांना बहर आलेला आहे. वसंत ऋतू काळात झाडाची पूर्ण पाने गळून फक्त गुलाबी फुलेच फुलतात. त्यामुळे सध्या छेडानगर ते विक्रोळी परिसर गुलाबी रंगाच्या चादरीने झाकून गेला आहे. या गुलाबी फुलांच्या चादरीमुळे हा परिसर स्थानिक नागरिक, वाहनचालक, प्रवाशांना प्रसन्न वाटत असून, या परिसरात आल्यानंतर त्यांना परदेशात आल्याचा भास होत आहे.
या गुलाबी फुलांचे सौंदर्य पाहण्यासाठी आणि फोटो काढण्याकरिता मुंबईकर इतर लोकही गर्दी करताना दिसत आहेत.

या मार्गावरून प्रवास करताना गुलाबी फुले पाहून मनाला अल्हाददायक वाटते. मन प्रसन्न होते. या महिन्यात कुटुंबासह या ठिकाणी येतो. शासनाने अशा प्रकारची झाडे लावणे गरजेचे आहे.
- अहमद मालीम, पर्यटक

गुलाबी फुलांचे सौंदर्य पाहून मन प्रसन्न होत आहे. ‘वसंत राणी’ फुलाची पसरलेली चादर पाहून मन मोहून गेले आहे. पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे.
- सुप्रिया हरेश, प्रवासी

जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांत या मार्गावरून प्रवास प्रवास करताना छान वाटते. वर्षातील बाराही महिने या मार्गावरील झाडे गुलाबी फुलांनी बहरलेली पाहिजेत.
- जालीम सिंग, टॅक्सी वाहनचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com