जंजिरा संस्थान मुक्ती संग्राम दिन उत्साहत साजरा

जंजिरा संस्थान मुक्ती संग्राम दिन उत्साहत साजरा

Published on

जंजिरा संस्थान मुक्ती संग्राम दिन उत्साहात
मुरुड, ता. ३१ (बातमीदार) ः मुरुडमध्ये जंजिरा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आझाद चौकात मुरुड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला असला, तरी जंजिरा संस्थानच्या विलीनीकरणास काही काळ लागला होता. अखेर ३१ जानेवारी १९४८ रोजी जंजिऱ्याच्या नवाबाने तत्कालीन मुख्यमंत्री बा. द. खेर यांच्या उपस्थितीत सामिलनाम्यावर स्वाक्षरी केली. तेव्हापासून हा दिवस जंजिरा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. या संग्रामात नानासाहेब पुरोहित, हरिभाऊ भडसावळे, मोहन धारिया आणि गोविंद लिमये यांसारख्या अनेक नेत्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. जंजिरा मुक्ती संग्राम दिन मुरुडमध्ये अधिकारी, स्थानिक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा झाला.
याप्रसंगी मुरुड तहसीलदार आदेश डफळ, पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे, उपनगराध्यक्ष विरेंद्र भगत, कोर्लई येथील माऊंट कार्मेल चर्चचे धर्मगुरू फादर बोनाव्हेंचर नुनीस, माजी तहसीलदार नयन कर्णिक, माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर, नगरसेविका प्रांजली मकू, नगरसेवक आदेश दांडेकर, ज्येष्ठ शिवसैनिक प्रमोद भायदे, नगरसेवक पांडुरंग आरेकर, श्रीकांत खोत आदींसह एस. ए. हायस्कूल व ओंकार विद्या मंदिर उच्च माध्यमिक शाळेचे विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षक वृंद व विद्यार्थी वर्गाने असंख्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शासकीय स्तरावर साजरा व्हावा
हैदराबाद संस्थानातील मराठवाड्याला १७ सप्टेंबर रोजी स्वातंत्र्य मिळाल्याने हा दिवस शासकीय स्तरावर मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच धर्तीवर ३१ जानेवारी हा दिवस जंजिरा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जावा, अशी मागणी नागरिकांच्या वतीने सांगितले आहे. हा दिवस शासकीय पातळीवर साजरा होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न सुरु असून लवकरच यश प्राप्त होईल, अशी अपेक्षा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com