भरधाव कारची धडक;. दुचाकीस्वाराला दोन किमी फरफटत नेल्याने मृत्यू
कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
श्रीवर्धन, ता. ३१ (बातमीदार) : तालुक्यातील दिवेआगर बोर्ली पंचतन मार्गावर भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार मोहम्मद हनीफ अरजबेगी यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अरजबेगी हे आपल्या पत्नी सीमन यांच्यासह शेखाडी येथे नातेवाइकांच्या लग्नसमारंभासाठी दुचाकीवर गेले होते. कार्यक्रम आटोपून परत येत असताना कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर अरजबेगी कारखाली अडकले. मात्र, चालकाने वाहन न थांबवता पुढे नेल्याने ते फरपटत गेले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

