उघड्या गटाराने अपघाताला आमंत्रण
उघड्या गटाराने अपघाताला आमंत्रण
घाचीयापाड्यातील प्रकार, दुरुस्तीची मागणी
तारापूर, ता.१ (बातमीदार) ः घाचियापाडा गावात सार्वजनिक शौचालयासमोर किराणा दुकानाजवळ असलेली उघडी गटार गेल्या धोकादायक ठरत आहे. डहाणू नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
मसोली घाचियापाडा वस्तीच्या रस्त्यालगतची ही गटार सध्या उघड्या अवस्थेत आहे. फुटलेल्या झाकणातून लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. सार्वजनिक शौचालय, किराणा दुकानालगतच असल्यामुळे दिवसभर नागरिकांची ये-जा सुरू असते. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले तसेच लहान मुले मार्गाचा नियमित वापर करीत असल्याने कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे. अंधाराच्या वेळी गटारात पडण्याची दाट शक्यता असून गंभीर दुखापत होण्याचा धोका अधिक वाढला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी डहाणू नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नसल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
----------------------------
अनेक दिवसापासून डहाणू नगरपरिषदमध्ये तक्रार करून गटार बंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
- रूपेश तांडेल, ग्रामस्थ, डहाणू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

