‘रोजगार हमी योजना उत्पन्नाचे माध्यम’

‘रोजगार हमी योजना उत्पन्नाचे माध्यम’

Published on

‘रोजगार हमी योजना उत्पन्नाचे माध्यम’
वाणगाव (बातमीदार)ः शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता सेंद्रिय पद्धतीने फळपीके, भाजीपाला लागवड यांचे उत्पादन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मनरेगा आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगारचे साधन नसते. यासाठी शासनामार्फत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच शेतकऱ्यांच्या शेतावर फळबाग, गांडुळ खत, नाडेफ युनिट माध्यमातून उत्पन्नाचे साधन निर्माण करून दिल्याने शेतकरी योजनांचा लाभा घेत आहेत. यावेळी अनिल पाटील यांच्या शेतात कृषी विभागामार्फत केलेली हरभरा लागवड, बांधावर तुर लागवड, नैसर्गिक शेतीचे जैविक घटक उत्पादन युनिट, हळद लागवड, मधुमक्षिका पालन युनिट यांचीही पाहणी बास्टेवाड यांनी केली. ग्रामीण भागात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विविध कामे घेतली जातात. यामुळे ग्राम स्तरावर आपल्याच गावात आपल्या शेतात काम करून शेतकरी व ग्रामस्थांना रोजगार मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com